AI च्या जगात आता मनमानी चालणार नाही, केंद्र सरकार आणणार नवे नियम; कशावर विशेष लक्ष?

एआयमधील वाढत्या गैरप्रकारांमुळे सामान्य माणसांची दिशाभूल होत असून सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पण आता या अनियंत्रित एआय तंत्रज्ञानाला वेसण घालण्यासाठी केंद्र सरकार थेट मैदानात उतरले आहे. लवकरच सरकार काही कठोर नियमांची घोषणा करणार आहे.

| Updated on: Oct 09, 2026 | 3:48 PM
1 / 5
केंद्र सरकारचे मोठे पाऊल: भारतातील वाढत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आता कडक नियम लागू करण्याच्या तयारीत असून, लवकरच नवीन धोरण स्पष्ट केले जाणार आहे.

केंद्र सरकारचे मोठे पाऊल: भारतातील वाढत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आता कडक नियम लागू करण्याच्या तयारीत असून, लवकरच नवीन धोरण स्पष्ट केले जाणार आहे.

2 / 5

कन्सल्टेशन पेपरची घोषणा: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुढील एका महिन्यात सरकार AI नियमनावर एक 'कन्सल्टेशन पेपर' (Consultation Paper) जारी करणार आहे, ज्यामध्ये लोकांच्या आणि तज्ञांच्या प्रतिक्रिया मागवल्या जातील.

3 / 5

डीपफेकच्या वाढत्या धोक्याला आळा: एआयचा वापर करून बनवलेले खोटे व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ (डीपफेक) समाजमाध्यमांवर वेगाने पसरत असून, यातून निर्माण होणारी चुकीची माहिती आणि गैरप्रकार रोखणे हे या नियमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

4 / 5

मानवी सुरक्षेला प्रथम प्राधान्य: एआयमुळे होणाऱ्या बदलांमध्ये मानवी हित आणि सुरक्षा सर्वात केंद्रस्थानी असायला हवी, तसेच या तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करण्यावर सरकारचा मुख्य भर राहणार आहे.

5 / 5

स्किल डेव्हलपमेंटवर भर: एआयच्या वाढत्या प्रभावामध्ये सामान्य माणूस मागे राहू नये, यासाठी नागरिकांना एआयशी संबंधित नवनवीन स्किल्स शिकवण्याच्या उद्देशाचाही या प्रस्तावित फ्रेमवर्कमध्ये समावेश असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us