Railway New Rule : रेल्वेच्या प्रवासाबाबत सर्वात मोठा निर्णय, आता प्रवाशांना…भारतीय रेल्वेच्या आदेशामुळे कोट्यवधी लोकांचा फायदा!
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा कोट्यवधी प्रवाशांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे हा नवा नियम 1 एप्रिल रोजीपासूनच लागू झाला आहे. हा नवा नियम काय आहे, ते जाणून घ्या...

भारतीय रेल्वेने एक मोठा आणि फार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या बोर्डिंग स्टेशनसंदर्भात आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे. हा बदललेला नियम काय आहे? ते जाणून घेऊ या...

बदललेल्या या नियमाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 रोजीपासून केली जात आहे. या नियमानुसार आता प्रवाशाला आपले बोर्डिंग स्टेशन ट्रेनचा प्रवास सुरू होण्याच्या 30 मिनिटांच्या अगोदरही बदलता येणार आहे.

अगोदर तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल तर ट्रेन सुरू होण्याच्या 24 तासांच्या अगोदरच हा बदल करावा लागायचा. ट्रेन सुरू व्हायला 24 तासांपेक्षा कमी कालावधी असेल तर प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येत नव्हते.

आता बदलेलल्या नियमानुसार IRCTC ची वेबसाईट, अॅप, रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटरच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलता येते. तुम्ही केलेल्या बदलानुसार तुमचा नवा बोर्डिंग पॉइंट सेकंड रिझर्वेशन चार्टमध्ये अपडेट केले जाणार आहे.

म्हणजेच ट्रेनने प्रवास सुरू करण्याच्या अवघ्या अर्ध्या तासाअगोदरही तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. अचानक प्रवासात बदल झालेल्या प्रवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.