
भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे. या ठिकाणी सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय की, सर्वाधिक वेगाने धावणारी ट्रेन मोठ्या पुलावर किंवा लांब बोगद्याजवळ येताच अचानक मंदावते, हा योगायोग नाही.

यामागे रेल्वे सुरक्षेचा एक नियम आहे. भारतासारख्या विशाल रेल्वे नेटवर्क असलेल्या देशात, दररोज लाखो गाड्या शेकडो पूलावरुन आणि बोगद्यांमधून जातात.

यावेळी त्याचा वेग हा फारच कमी असतो. यामागे अनेक अभियांत्रिकी आणि सुरक्षेची कारणे आहेत. या भागात गाड्यांचा वेग कमी का होतो याची ५ मुख्य कारणे आपण जाणून घेणार आहोत.

बोगदे आणि पुलांमध्ये अनेकदा वळणे, उतार किंवा कमी प्रकाश असतो, ज्यामुळे लोकोपायलटला पुढे स्पष्टपणे पाहणे कठीण होते. जेव्हा ट्रेनची गती कमी असते तेव्हा चालकाला सिग्नल, ट्रॅकची स्थिती किंवा अडथळे यांचे निरीक्षण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

प्रत्येक पूल आणि बोगद्याची एक विशिष्ट भार क्षमता असते. जेव्हा ट्रेन हळू चालते, तेव्हा तिचे वजन पुलाच्या खांबांवर, सांध्यांवर आणि संरचनेवर समान प्रमाणात वितरित केले जाते.

ट्रेन वेगाने गेल्यास त्याच्या कंपनाने आणि वजनाने जुन्या पुलांना नुकसान पोहोचू शकेल. त्यामुळे या ठिकाणी मर्यादित वेग राखणे महत्त्वाचे आहे. जर ट्रेन वेगाने बोगद्यात घुसल्यास प्रवाशांना जोरदार धक्के बसू शकतात. तसेच त्याला हवेच्या दाबामुळे अस्वस्थ वाटू शकते.

ट्रेन जेव्हा बोगद्यातून किंवा पुलावरून जाते, तेव्हा आजूबाजूच्या हवेच्या दाबामध्ये अचानक बदल होतो. यामुळे ट्रेन अस्थिर होऊ शकते. जर वेग कमी असेल तर हवेचा दाब हळू हळू नियंत्रित होतो. तसेच ट्रेनची स्थिरता कायम राहते.

त्यामुळे बोगदा किंवा पुलासमोर ट्रेनचा वेग कमी करणे ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, आरामासाठी आणि संरचनात्मक स्थिरतेसाठी एक खबरदारी आहे.