घड्याळाच्या काट्यावर पळणारे मुंबईकर 13 तास एकाच जागी, विमानतळावर काय घडलं ?

मंगळूर-मुंबई इंडिगो विमान अचानक रद्द झाल्याने मुंबईचे शेकडो प्रवासी तब्बल 13 तास विमानतळावर अडकले. पर्यायी व्यवस्था व माहितीअभावी प्रवाशांचा संताप अनावर झाला. कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली आणि प्रवाशांनी तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली. या प्रकारामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण होते, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Updated on: Dec 03, 2025 | 3:02 PM
1 / 6
मुंबईकरांच्या नशीब हे घड्याळ्याच्या काट्याशी बांधलेलं आहे, असं पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते. सतत घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे मुंबईकर चक्क एकाच जागी, तब्बल 13 तास अडकून पडल्याचे मोठा गोंधळ झाला.

2 / 6
मँगलोर विमानतळावर काल रात्री पासून मुंबईकर नागरिक अडकून पडले होते.इंडिगो विमान कंपनीचं मँगलोर-मुंबई विमान अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांकडून मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक तास वाट पहावी लागल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

3 / 6
काही ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइट 6E-5150 रद्द झाली. ही फ्लाईट काल, म्हणजे मगंळवारी 2 डिसेंबर रोजी रात्री 9.25 ची होती, पण ती रद्द झाल्याने सर्व प्रवासी तिथेच रखडले. उड्डाण रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे . इंडिगोकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

4 / 6
याचा परिणाम म्हणून संपूर्ण विमानतळावर गोंधळाचं वातावरण होतं. वाट पहावी लागल्यामुळे वैतागलेल्या , संतपालेल्या प्रवाशांची विमानतळावरच इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी बाचाबाची देखील झाली. तब्बल 13 तास हे प्रवासी मंगलोर विमानतळावरच रखडले होते.

5 / 6
पर्यायी व्यवस्था झाली नाही,अपडेट्स मिळत नव्हते यामुळे प्रवाशांचा संताप अजूनच वाढला. याची तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.

6 / 6
संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, क्रूने प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण पर्यायी व्यवस्था न झाल्याने तसेच अडकून पडल्याने पुढली काम रखडल्याने प्रवासी वैतागले होते, त्यांच्या संतापाच्या लाटांचा सर्वांना सामना करावा लागला.