Gaitonde’s Home: ‘दृश्यम’मधील इन्स्पेक्टर गायतोंडेचं सुंदर घर; विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती अन् तो भावनिक कोपरा

Kamlesh Sawant Home Tour: आज ‘दृश्यम’मधील इन्स्पेक्टर गायतोंडे म्हणून लोकप्रिय असलेल्या कमलेश सावंत यांचं घर त्यांच्या साध्या स्वभावाची आणि मेहनतीच्या प्रवासाची सुंदर झलक दाखवतं.

| Updated on: Oct 14, 2026 | 11:20 AM
1 / 10
‘दृश्यम’ फ्रँचाइजीमधील इन्स्पेक्टर गायतोंडे म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो तो अभिनेता कमलेश सावंत! आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या कमलेश सावंत यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या घराचीही खासियत आहे. ठाण्यातील त्यांच्या 2 बीएचके फ्लॅटची सुंदर झलक समोर आली आहे.

‘दृश्यम’ फ्रँचाइजीमधील इन्स्पेक्टर गायतोंडे म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो तो अभिनेता कमलेश सावंत! आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या कमलेश सावंत यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या घराचीही खासियत आहे. ठाण्यातील त्यांच्या 2 बीएचके फ्लॅटची सुंदर झलक समोर आली आहे.

2 / 10

साधेपणा, मोकळी जागा, कुटुंबाच्या आठवणी आणि आयुष्यात मिळवलेल्या यशाची साक्ष देणाऱ्या वस्तूंनी त्यांचं घर सजलं आहे. विशेष म्हणजे, चाळीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ठाण्यातील स्वतःच्या घरापर्यंत पोहोचला आहे.

3 / 10

कमलेश सावंत यांचं ठाण्यात 780 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेलं 2 बीएचके घर आहे. घर सजवताना त्यांनी दिखाऊपणापेक्षा साधेपणाला प्राधान्य दिलं आहे. त्यांना फारसं फर्निचर आवडत नसल्याने घरात मोजकंच फर्निचर ठेवण्यात आलं आहे.

4 / 10

घरात भरपूर मोकळी जागा असावी, असं त्यांना वाटतं. त्यामुळे घराचा प्रत्येक कोपरा प्रशस्त आणि वापरण्यास सोयीचा दिसतो. घरातील स्टोअर रूमच्या जागेचा वापर बदलून तिथे डायनिंग एरिया तयार करण्यात आला आहे.

5 / 10

उपलब्ध जागेचा योग्य वापर करून घर अधिक उपयुक्त बनवण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी आहे. त्यांच्या सोसायटीमध्ये जिम, स्विमिंग पूल आणि लहान मुलांसाठी प्ले-ग्राऊंडसारख्या सुविधाही आहेत.

6 / 10

कमलेश सावंत यांना त्यांच्या अभिनयासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. ‘झाला बोभाटा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कारासोबत 50 हजार रुपयांचं रोख पारितोषिकही त्यांना मिळालं होतं. आजही पुरस्काराची बाहुली त्यांनी घरात जपून ठेवली आहे.

7 / 10

कमलेश यांच्या घरातील आणखी एक भावनिक कोपरा म्हणजे त्यांच्या आईची बेडरूम. ही खोली त्यांच्यासाठी खूप खास आहे. घरातील प्रत्येक वस्तू केवळ सजावटीसाठी नसते, तर तिच्यामागे एखादी आठवणही असते, याची जाणीव या खोलीतून होते.

8 / 10

कमलेश सावंत हे कुटुंबातील शेंडेफळ आहेत. काळाचौकीतील चाळीत असलेलं वडिलांचं घर त्यांच्या भावंडांनी त्यांच्या नावावर केलं. ते घर विकून त्यांनी ठाण्यातील हा फ्लॅट खरेदी केला. त्यामुळे या घरामागे कुटुंबाचं प्रेम आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी दडलेली आहे.

9 / 10

घरातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्तीही खास आहे. ही मूर्ती त्यांच्या पत्नीने रस्त्यावरील एका कारागिराकडून खरेदी केली होती. घरी येणाऱ्या पाहुण्यांचं लक्ष या मूर्तीकडे आवर्जून जातं.

10 / 10

काळाचौकीतील चाळीत जन्मलेल्या कमलेश यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मिमिक्री करत आपल्या प्रवासाची सुरुवात केली. तिथून पुढे अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us