
बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये बारामतीचा प्रसिद्ध रीलस्टार सूरज चव्हाण आहे. बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण आहे असं सांगितलं तरी कोणालाही विश्वास बसला नसावा, पण हे खरं आहे. सूरज चव्हाणने पहिल्याच दिवशी सर्वांना आपलं मानधन सांगितल्यावर सगळेच शॉक झाले.

पहिल्या दिवशी योगिता चव्हाण आणि पंढरीनाथ कांबळे दोघेजण सूरजसोबत गप्पा मारत होते. त्यावेळी त्याने आपली परिस्थिती सांगताना बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

टिकटॉकवेळी मला दिवसाला रिबिन कापायला मला 80,000 हजार रूपये मिळायचे, असं सूरज चव्हाण म्हणाला. त्यावेळी एक दिवसाचे मानधन 80,000 ऐकून योगिता शॉक झाली.

आतापण मी एका दिवसाचे 30 ते 50 हजार घेत असल्याचं सूरजने बिग बॉसमध्ये सांगितलं. यावेळी त्याला लोकांनी सुरूवातीला खूप लूटल्याचं सांगितलं.

मला आधी लोकांनी खूप लूटलंय. त्यामुळे माझ्या बहिणींना मला एकच म्हणतात की तू फक्त सुधर आम्हाला लय बरं वाटेल, असं सूरज चव्हाण म्हणाला.