रिकाम्या खोलीत बोलल्यावर आवाज का घुमतो? जाणून घ्या यामागचं कारण!

अनेकदा आपण बघतो की रिकाम्या खोलीमध्ये आपण काही बोलला तर तिथे आवज घुमतो. असं का होतं याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे? चला यामागचं कारण जाणून घ्या.

| Updated on: Nov 07, 2026 | 2:20 PM
1 / 5
जेव्हा आपण रिकाम्या खोलीत बोलतो, तेव्हा आपल्या आवाजाच्या ध्वनीलहरी भिंती, छत आणि जमिनीवर आदळून पुन्हा परत येतात. त्यामुळे आवाज घुमल्यासारखा जाणवतो.

जेव्हा आपण रिकाम्या खोलीत बोलतो, तेव्हा आपल्या आवाजाच्या ध्वनीलहरी भिंती, छत आणि जमिनीवर आदळून पुन्हा परत येतात. त्यामुळे आवाज घुमल्यासारखा जाणवतो.

2 / 5

घरात सोफा, पडदे, गालिचे, उशा यांसारख्या वस्तू आवाज शोषून घेतात. मात्र, रिकाम्या खोलीत अशा वस्तू नसल्यामुळे ध्वनीलहरींचे परावर्तन जास्त होते.

3 / 5

आवाज ऐकल्यानंतर तो किमान ०.१ सेकंदांनी पुन्हा ऐकू आला, तर त्याला प्रतिध्वनी (Echo) म्हणतात. मात्र, लहान रिकाम्या खोल्यांमध्ये आवाज लगेच परत येत असल्यामुळे निनाद (Reverberation) निर्माण होतो.

4 / 5

भिंतींवरून परत येणाऱ्या ध्वनीलहरी मूळ आवाजात मिसळतात. काही लहरी एकमेकांना बळ देतात, त्यामुळे आवाज अधिक मोठा, घुमणारा किंवा वेगळा ऐकू येतो.

5 / 5

खोलीत सोफा, खुर्च्या, पडदे आणि गालिचे ठेवल्यामुळे ध्वनीलहरी शोषल्या जातात आणि त्यांचे परावर्तन कमी होते. त्यामुळे आवाजाचा घुमणारा प्रभाव कमी होऊन खोलीतील आवाज नैसर्गिक वाटू लागतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us