
योगासने ही आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही अनेक योगासने करता येतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणती योगासने फायदेशीर ठरतात ते जाणून घेऊया.

भुजंगासन हे आपले हृदय स्वस्थ ठेवण्याचे काम करते. या आसनामुळे पाठीचा कणाही लवचिक राहतो. त्यामुळे पाठीच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

ताडासन हे आसन करण्यास सोपे असले तरी त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. या आसनामुळे हृदयाची गती सुधारते तसेच ब्लड प्रेशरची पातळीही नियंत्रणात राहते. तसेच आपल्या शरीराचे पोश्चरही सुधारते.

ताडासनप्रमाणेच वृक्षासनही सरळ उभे राहून केले जाते. या आसनामुळे शरीराचा समतोल राखला जातो. ही एक प्रकारची बॅलन्सिंग पोझ आहे. हे आसन केल्यामुळे आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच हे आसन केल्याने आपले हृदयही तंदुरुस्त राहते.

उत्कटासन करताना सुरुवातीला कदाचित त्रास होऊ शकतो. हे आसन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ते खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. तसेच हृदयविकार दूर ठेवायचा असेल तर त्यासाठीही हे आसन खूप फायदेशीर ठरू शकते.