
जास्त थंडी वाजायला लागली की मद्यपी मद्य प्राशन करतात. हिवाळ्यात मद्य प्राशन केल्यावर थंडी कमी लागते, असा दावा काही मद्यपी करतात. म्हणूनच अनेकजण हिवाळ्यात मित्रांसोबत मद्य प्राशन करण्याचा बेत आखतात.

अनेकजण हिवाळ्यात मद्यप्राशन केले तरी त्याच नशा मात्र फारशी चढच नाही, असा दाहावी केला जातो. परंतु हा दावा खरा आहे की हे एक मिथक आहे, ते जाणून घेणे गरजेचे आहे. कारण याबाबत योग्य माहिती नसल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

मद्यप्राशन केल्यावर गामा अमिनोब्युटेरिक अॅसीड या रिसेप्टवर परिणाम पडतो. त्यामुळे शरीरातील न्यूरॉन्सची कार्यप्रणाली मंदावते. त्यामुळेच मद्य प्राशन केलयानंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरामदायी वाटते. थंडीमध्ये मात्र ही प्रक्रिया काहीशी वेगळी असते.

थंडीमध्ये शरीराची चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे शरीर गरम ठेवण्यासाठी माणसाला जास्त उर्जा खर्च करावी लागते. त्यामुळेच मद्यापान केल्यावर त्याची नशा हळूहळू चढते, असा दावा केला जातो.

मात्र थंडीमध्ये मद्य कमी चढते असे समजून प्रमाणापेक्षा मद्यप्राशन केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. शरीरामधील चेतना कमी होऊ शकतात. त्यामुळे थंडी वाजत असल्याचेही शरीराला उशिराने समजते. त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

(मद्यप्राशन करणे हे शरीरास हानिकारक आहे. मद्यप्राशन करणे चुकीचे आहे. या लेखातील माहिती इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)
