
एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. गुंतवणुकीच्या या प्रकारात जोखीम असतेच. पण शेअर बाजाराच्या तुलनेत ही जोखीम कमी असते. त्यामुळेच आज कोट्यवधी लोक एसआयपी करण्याला प्राधान्य देतात.

याच एसआयपीच्या मदतीने तुम्ही 5000 रुपयांच्या गुंतवणुकीच्या मदतीने करोडपती होऊ शकता. हे कसं शक्य आहे, तेस समजून घेऊ या. नियमितपणे आणि शिस्त लावून 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर हे शक्य होऊ शकते.

तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक केली तर पुढच्या 31 वर्षांत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. याच ठिकाणी तुम्ही 5000 रुपयांची एसआयपी केली तर 10 टक्क्यांच्या रिटर्नच्या हिशोबाने पुढच्या 25 वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकता.

प्रत्येक महिन्याला 5000 रुपये याप्रमाणे तुम्ही सलग 25 वर्षे गुंतवणूक केली तर तुमचे एकूण 2,13,77,730 रुपये जमा होतील. तुम्ही 25 वर्षांत एकूण 59,00,823 रुपये जमा होतील. यावर तुम्हाला तब्बल 1,54,76,906 रुपये व्याज म्हणून मिळतील.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)