
Apple कंपनीचा फोन अर्थात iPhone बाळगणं हे आजकाल स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. प्रचंड महाग असणाऱ्या या फोनचं नवं मॉडेल दरवर्षी बाजारात येतं आणि ते घेण्यासाठी वेड्यासारखी गर्दी असते. iPhone चं नवं मॉडेल iPhone 17 प्रो 256 जीबी, हे नुकतचं लाँच झालं असून भारतातही ते विकत घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आयफोनची प्रचंड किंमत असूनही ते घेण्यासाठी लोकं उत्सुक असतात.( Photo : PTI/Getty Images)

मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनची सर्वात जास्त किंमत भारतात असून एका फोनसाठी लाखभरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. त्या तुलनेते जगातील इतर देशांमध्ये आयफोन तसा स्वस्त आहे. आयफोन 17 प्रोची कोणत्या देशात किती किंमत आहे, ते जाणून घेऊया.

भारत - भारतात iPhone 17 प्रो 256 जीबी ची किंमत आहे तब्बल 1 लाख 35 हजार 900 रुपये.

यूके - तर त्यापाठोपाठ यूकेमध्येही याची किंमत अधिक असून iPhone 17 प्रो 256 जीबी या मॉडेलसाठी 1 लाख 21 हजार 800 रुपये मोजावे लागतात.

फ्रान्स - फ्रान्समध्येही आयफोन बऱ्यापैकी महाग असून 1 लाख 20 हजार रुपये देऊन तुम्ही iPhone 17 प्रो 256 जीबी मॉडेल विकत घेऊ शकता.

जर्मनी - त्यापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे जर्मनी हा देश. इथे iPhone 17 प्रो 256 जीबीची किंमत 1 लाख 10 हजार 800 रुपये इतकी आहे.

कॅनडा - कॅनडामध्ये 93 हजार 900 रुपये भरून iPhone 17 प्रो 256 जीबी हे मॉडेल विकत घेता येईल.

यूएई - 98 हजार 200 रुपये देऊन यूएईमध्ये आयफोन प्रोचं नवं मॉडेल मिळतं .

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियामध्ये iPhone 17 प्रो 256 जीबी या मॉडेलसाठी 97 हजार 300 रुपये मोजावे लागतात.

अमेरिका - यूएसमध्ये iPhone 17 प्रो 256 जीबीच्या मॉडेलची किंमत आहे 86 हजार 900 रुपये

सिंगापूर - सिंगापूरमध्ये आयफोनचं हे नवं मॉडेल (iPhone 17 प्रो 256 जीबी) 91 हजार 200 रुपयांत विकत मिळतं.

जपान- तर या यादीत जपान सर्वात शेवटी असून तिथे आयफोन र्वात स्वस्त दिसतोय. iPhone 17 प्रो 256 जीबीसाठी जपानमध्ये 85 हजार 600 रुपये भरावे लागतील.