
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 27 वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ही लढत रंगणार आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.

उभयसंघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 30 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई वरचढ राहिली आहे. मुंबईने 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 12 सामन्यात चेन्नईला उपट दिली आहे.

दोन्ही संघांची मागील 5 सामन्यांची आकडेवारी पाहता मुंबई चेन्नईवर वरचढ राहिली आहे. मुंबईने या 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला. तर चेन्नईने 1 वेळा मात केली आहे.

दिल्लीतील या मैदानावर हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. याआधी हे दोन्ही संघ 2013 मध्ये भिडले होते. त्यावेळेस चेन्नईने मुंबईचा 48 धावांनी पराभव केला होता.

मागील हंगामात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.