
दक्षिणेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका जावलकर सध्या चर्चेमध्ये आहे. ती चर्चेमध्ये येण्याचं कारण तिचा कुठला चित्रपट नाहीय, तर ती एका प्रसिद्ध क्रिकेटपटूला डेट करेतय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, तो कोण क्रिकेटपटू आहे? जो प्रियंका जावलकरच्या प्रेमात पडला आहे.

प्रियंका जावलकर टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू वेंकटेश अय्यरला डेट करत आहे. टीम इंडियाकडून खेळताना वेंकटेश दमदार कामगिरी केली. पण सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये त्याला छाप उमटवता आलेली नाही.

इन्स्टाग्रामच्या एका पोस्टवरुन वेंकटेश आणि प्रियंकाच्या प्रेमाची चर्चा सुरु झाली आहे. खरंतर याआधी अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंबरोबर संसार थाटला आहे. अनुष्का शर्मा-विराट कोहली हे एक उदहारण आहे.

अलीकडेच वेंकटेशने प्रियंकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एक कमेंट केली होती. त्यावरुनच प्रियंका आणि वेंकटेश परस्परांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

वेंकटेशने प्रियंकाच्या एका फोटोवर कमेंट केली. प्रियंकाने तिचा एक फोटो पोस्ट केला. त्यावर वेंकटेशने क्यूट अशी कमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ही कमेंट केली होती. पण फॅन्सना आता असं वाटतय की, दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे.

प्रियंका जावलकर तेलुगु फिल्ड इंडस्ट्रीतील एक मोठी अभिनेत्री आहे. तिने एसआर कल्याण मंडपम आणि टॅक्सीवाला सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.