

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. रश्मिका ही साऊथची खूप मोठी अभिनेत्री असून ती नॅशनल क्रश देखील आहे.

रश्मिकासोबत बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ देखील आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिसू शकते. मात्र, अद्याप कतरिनाच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.


आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरजित सिंग देखील परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे चाहते या सेरेमनीसाची वाट पाहत आहेत.