
राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघामध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना सुरू आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉकवर सुरू आहे.

आजच्या सामन्यात जो संघ सामना जिंकेल तो संघ फायनल गाठणार आहे. फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत याच मैदानावर होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

राजस्थानसाठी शिमरॉन हेटमायर हा खेळाडू लकी चार्म ठरला आहे. हेटमायरने राजस्थान रॉयल्स संघासाठी 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 7 जिंकले आणि केवळ 2 सामने गमावले. मात्र हेटमायर संघात नव्हता तेव्हा 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला होता.

आरसीबीविरद्धच्या सामन्यामध्ये हेटमायरने 14 चेंडूत 26 धावांची खेळी केली होती. आरसीबीला पराभूत करण्याता महत्त्वाची भूमिका त्याची राहिली.

शिमरॉन हेटमायर यंदाच्या मोसमामध्ये 11 सामन्यांमध्ये 27.25 च्या सरासरीने 109 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. आजच्या सामन्यातही रॉयल्स प्रथम गोलंदाजी करत असल्याने धावांचा पाठलाग करताना हेटमायरची बॅटींग चालली तर हैदराबादचा पराभव निश्तिच मानलं जात आहे.