Hardik Pandya : कोट्यवधीच्या फरारी कारमध्ये बसून हार्दिक पंड्या ऐकतो या देवाचं स्तोत्र, सांगितलं त्यामागचं कारण
Hardik Pandya : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनशिपवरुन हटवून हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवण्यात आलं. हार्दिकच लक्ष्य आता सहाव्यांदा मुंबई इंडियन्सला आयपीएलचं जेतेपद मिळवून देण्यावर असेल. हार्दिक पंड्याने नुकत्याचं संपलेल्या टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं.

टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे. यावेळी मात्र वेगळं कारण आहे. महागडी लाइफस्टाइल आणि वादांमध्ये हार्दिक पंड्याच्या व्यक्तीमत्वाचा असा एक पैलू समोर आलाय, ज्याने सर्वांना चक्रावून सोडलं आहे.

हार्दिक पंड्या आपल्या स्टायलिश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. अनेकदा हार्दिकचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्याच्याकडे फरारी आणि लॅम्बॉर्गिनी सारख्या महागड्या कारस आहेत. कोट्यवधीची घड्याळं, बॉडीवर अनेक टॅटू यामुळे हार्दिकची नेहमी चर्चा होते.

मागच्या सीजनमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं. टीम प्लेऑफ पर्यंत पोहोचली. आता कॅप्टन पंड्याची नजर आयपीएल ट्रॉफीवर आहे. हार्दिक वर्ष 2024 मध्ये मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन बनला.

एका व्हायरल व्हिडिओमध्ये बोलताना हार्दिक पंड्याने सांगितलं की, तो त्याच्या कोट्यवधीच्या लग्नजरी करामध्ये हनुमान चालीसा ऐकतो. हार्दिक पंड्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात तो फरारी कार पळवताना दिसला होता.

पंड्या म्हणाला की, माझ्याकडे फरारी आहे. पण त्यात मी हनुमान चालीसा ऐकतो. देवाने माझ्यावर कृपा केलीय. कुठलही गाणं हनुमान चालीसा इतकं पॉझिटिव एनर्जी देत नाही. हार्दिकच्या या स्टेटमेंटनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी “जय श्री राम” च्या घोषणा दिल्या.