
1. ज्योतिर्लिंग स्पेशल टूरचे एकूण 2 पॅकेज आहेत IRCTC च्या ज्योतिर्लिंग स्पेशल टूर पॅकेजमध्ये देशातील 12 ज्योतिर्लिंग तीर्थस्थळांची यात्रा करता येणार आहे. यात सोमनाथ ज्योतिर्लिंग,मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, भगवान बैद्यनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, केदारेश्वर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, रामेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, विश्वे श्वर ज्योतिर्लिंग, आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या संपूर्ण 12 शंकर भोलेनाथांच्या ज्योतिर्लिंगांचा अंतर्भाव केलेला आहे. IRCTC च्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहीतीनुसार, 2 पॅकेज आहेत. एक पॅकेज ऑगस्ट महिन्यातील आहे तर दुसरे सप्टेंबर 2024 मधील आहे.

2. ऑगस्ट महिन्यातील पॅकेजमध्ये काय ? IRCTC च्या मते ऑगस्ट महिन्याच्या पॅकेजमध्ये भाविकांना छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद), द्वारका, नाशिक, पुणे, सोमनाथ आणि उज्जैन मधील 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या पॅकेजनूसार संपूर्ण प्रवास ट्रेनमधून होणार आहे. यात 2AC, 3AC आणि SL श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्याचा आनंद मिळणार आहे. 12 दिवसांच्या या प्रवासात विजयवाडा, मधीरा, खम्मम, दोर्नाकल जंक्शन, महबूबाबाद, वारंगल, काझीपेट, जळगाव, भोंगिर, सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, धर्माबाद, मुदखेड, नांदेड आणि पूर्णा येथे बोर्डिंग/डी-बोर्डिंग स्टेशन आहेत. या स्थानकात तुम्ही ट्रेन पकडू किंवा सोडू शकता. या पॅकेजमध्ये संपूर्ण प्रवास ट्रेनमधून होणार आहे. 2AC, 3AC आणि SL श्रेणीच्या डब्यातून संधी मिळणार आहे.

3. रेल्वेची किती आसने आणि सुविधा स्पेशल ज्योतिर्लिंगांच्या टूर पॅकेजमध्ये एकूण 716 आसने (SL: 460, 3AC: 206, 2AC: 50) आहेत. यांचे तिकीट दर पाहाता.इकॉनॉमी क्लास (20,590 रु.), स्टँडर्ड (33,015 रु.) आणि डबल/ट्रीपल शेअरींग आधारावर कम्फर्ट (43,355 रु.) 5 ते 11 वयाच्या मुलांसाठी तिकीट दर अनुक्रमे 19,255 रु., 31,440 रु.आणि 41,465 रुपये आहे. या टुरमध्ये प्रवासात सकाळी नाश्ता, दुपारी आणि रात्रीचे जेवण मिळेल आणि तिर्थस्थळांच्या ठिकाणी स्टेशन ते तिर्थस्थळ AC बसेसची सुविधा देखील मिळणार आहे.

4. सप्टेंबर महीन्याचे ज्योतिर्लिंग टूर पॅकेज 10 रात्री /11 दिवस - IRCTC सप्टेंबर महीन्याचे ज्योतिर्लिंग टूर पॅकेजमध्ये 10 रात्री /11 दिवसांचे असणार आहे. या टुरची सुरुवात येत्या 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.या टुरमध्ये श्री गंगानगर, हनुमानगढ़, चूरू, सीकर जंक्शन, जयपुर आणि अजमेर स्थानकात बोर्डिंग/डी-बोर्डिंग सुविधा आहे.अर्थात या स्थानकातून तुम्ही प्रवास सुरु करु शकता.

Nashik - Trimbakeshwar- Panchwati - dahanu

5. कंफर्ट आणि स्टँडर्ड तिकीट IRCTC सप्टेंबर महीन्याच्या ज्योतिर्लिंग टूर पॅकेजचे दोन प्रकारच्या टुरची ऑफर आहे. कंफर्ट तिकीट ( 37,115 रु.) आणि स्टँडर्ड (30,155 रु.) 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी अनुक्रमे तिकीट दर 33,400 रु. आणि 28,765 असा आहे.