
अभिनेत्री हिना खानने 4 जून रोजी बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न करत सर्वांना सुखद धक्का दिला. यानंतर आता हिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच हिना आणि रॉकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला आहे.

या फोटोंमध्ये हिना खानचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय. पती रॉकीसोबत हिनाने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. यावेळीने तिना गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हिनाने तिच्या पोटावरून दुपट्टा घेतला असला तरी त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय.

या फोटोंवर हिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. लग्नाच्या अवघ्या दहा दिवसांतच हिनाचा बेबी बंप दिसल्याने ती घाईत लग्न का उरकलं, याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. प्रेग्नंसीमुळेच हिनाने हे पाऊल उचललं असावं, असं काहीजण म्हणत आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यात हिनाने तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. कॅन्सरवर मात केल्यानंतर तिने लगेचच बॉयफ्रेंड रॉकीशी लग्न केलं.

हिना आणि रॉकी गेल्या बारा ते तेरा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हिना कॅन्सरशी झुंज देताना रॉकीने तिची खूप साथ दिली होती. हिना मुस्लीम असून रॉकी हिंदू आहे. या दोघांचं आंतरधर्मीय लग्नसुद्धा चर्चेत राहिलं.