
आपल्यापैकी अनेकांना घरी कुत्रा, मांजर पाळणं आवडते. काहीजण तर त्यांना घरातील सदस्य समजतात. हल्ली अनेकांच्या घरात मांजर पाळण्याचे प्रमाण वाढले आहे.

मांजर पाळण्याबद्दल वास्तुशास्त्रात काही शुभ आणि अशुभ संकेत देण्यात आले आहेत. तसेच या मागे धार्मिक कारणंही पाहायला मिळते.

धार्मिक कारणानुसार मांजर पाळणे शुभ मानले जाते. कारण यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते.

पण काहीवेळा मांजर पाळणे अशुभ मानले जाते. मांजरीमुळे घरातील राहूचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील समस्यांची वाढ होते.

जर पाळीव मांजरीने घरात पिल्लांना जन्म दिला, तर यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगती होते. हे शुभ संकेत असतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही.

जर तुमच्या घरी अचानक सोनेरी रंगाची मांजर आली आली तर तुमच्या घरात सौभाग्य येते. भविष्यासाठी हे खूप शुभ मानले जाते. तसेच यामुळे आर्थिक लाभ मिळतो. सोनेरी रंगाच्या मांजरीमुळे अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतात.

पण जर तुमच्या घरात काळ्या रंगाची मांजर असणे अशुभ मानले जाते. काळ्या रंगाची मांजर रडू लागली, तर ते अशुभ संकेत असतात. हे एखाद्या दुर्घटनेचे सूचक असू शकतात.

जर काळी मांजर घरात आली आणि अचानक रडायला लागली, तर यामुळे मोठे नुकसान होते.

मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. मांजरींचा स्वभाव शांत असतो. त्यामुळे घरात शांती आणि समृद्धी वाढते. मांजराच्या उपस्थितीमुळे घरातील नकारात्मक ग्रह दोष कमी होतात.

जर तुमच्याकडे पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या मांजर असेल तर ते शुभ मानले जाते. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच घरातील सदस्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होते.

मांजरीने रस्ता ओलांडल्याने अशुभ होईल, असे मानले जाते. मात्र ही एक अंधश्रद्धा आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. मांजर हा एक शांत आणि प्रेमळ प्राणी आहे. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.