
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. या अभिनेत्रीने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण हा मालिका तिने अर्ध्यातून सोडली. त्यानंतर तेजश्री प्रधान आता 'वीण दोघांतली ही तुटेना' या नव्या मालिकेत काम करताना दिसत होती. पण आता तिने या मालिकेला देखील रामराम ठोकल्याचे म्हटले जात आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत तेजश्रीने स्वानंदीची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.

तेजश्रीची 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिने अचानक सोडण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत स्वानंदी आणि समर यांच्या लग्नाचा सोहळा पार पडत आहे. अशातच तेजश्री मालिका सोडणार असल्याचे कळताच चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

तेजश्रीच्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला केलेल्या पोस्टे लक्ष वेधले.

तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका सोफ्यावर बसली आहे. तिच्यासमोर एक माणूस बसला असून तो तिला काहीतरी समजावत आहेत. तेजश्री देखील त्यांचे बोलणे मन लावून ऐकत आहे. तिच्या समोर काही पेपरही ठेवले आहेत.

#newwebseries #newworkinprogress असे हॅशटॅग हिने या फोटोसहीत शेअर केले आहेत. तेजश्री प्रधान नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मग त्यासाठी ती मालिका सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

तेजश्रीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ती खरच मालिका सोडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.