
सद्यस्थितीत जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 97 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे घरात लग्न असलेल्या कुटुंबांचे वर वधूंचे सोने खरेदी करण्याचे बजेट कोलमडले आहे.

सोन्याचे दर कमी होईल म्हणून वाट बघितली मात्र उलट सोन्याचे दर वाढल्याने आहे त्या दरात लग्न वर्हाडी मंडळी सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे.

सोन्याचे दर आणखी वाढतील या भीतीने वर- वधू कडील मंडळी आजच आहे त्या भावात सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे.

Gold

चांगला परतावा मिळत असल्याने सोन खरेदी करण्यापेक्षा सोनं मोड करण्यासाठी ग्राहकांची सराफ दुकानामध्ये चांगली गर्दी होत आहे.

सध्याचे वाढते सोन्या आणि चांदीचे वाढते दर यामुळे सोन खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.