Gold Rate : युद्ध संपताच सोने-चांदीत मोठी पडझड, ग्राहकांना लागली लॉटरी, सराफा बाजारात एकच गर्दी

Jalgaon Sarafa Bazar : जळगावमधील सराफा बाजारात सोने आणि चांदीने ग्राहकांना आनंदवार्ता दिली. दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. ग्राहकांची सराफा बाजारात एकच गर्दी उसळली आहे. काय आहेत आता किंमती? जाणून घ्या एका क्लिकवरती...

| Updated on: Jun 28, 2025 | 5:10 PM
1 / 8
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे सोन्याचे दर हे एक लाखांच्या आत आले आहेत.  पाच दिवसात सोन्याचे दर तब्बल 3 हजार 300 रुपयांनी घसरले आहेत. १ लाखांचा आकडा पार केलेल्या सोन्याचे दर आता जीएसटी सह ९८ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहेत.

2 / 8
विक्रमी उच्चांकीवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात सुद्धा केल्या पाच दिवसात अडीच हजार रूपयांची घसरण झाली असून चांदीचे दर जीएसटीसह १ लाख 9 हजार रुपयांवर आले आहे

3 / 8
सोने आणि चांदीचा भाव घसरला

सोने आणि चांदीचा भाव घसरला

4 / 8
इराण आणि इजराइल या दोन्ही देशांमधील युद्धामुळे जळगावच्या सराफ बाजारामध्ये जून महिन्यात सोन्या चांदीच्या दरात मोठे चढ उतार पाहायला मिळाले.

5 / 8
जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दराने एक लाखांचा आकडा पार केला होता.. मात्र आता जून महिना अखेर सोन्याचे दर पुन्हा एक लाखाच्या आत आले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे

6 / 8
इराण आणि इजराइल या दोन्ही देशांमधील युद्धामुळे जून महिना हा सोन्या-चांदीच्या दरासाठी मोठा परिणामकारक ठरल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

7 / 8
पुढील काळात इराण आणि इजराइल या दोन्ही देशांमधील युद्ध कायमचं थांबलं किंवा युद्धजन्य परिस्थिती संपली तर सोन्याचे दर आणखी 91 हजार रुपयांपर्यंत घसरतील असा अंदाज सुद्धा सराफ व्यावसायिक व्यक्त केला आहे

8 / 8
महिनाभरापासून भाव कमी जास्त होत असल्याने खरेदी कधी करायची अशी द्विधा मनस्थिती असल्याचे महिला ग्राहकांनी सांगितले. तर एक लाखांचा आकडा पार केलेले सोन्याचे दर पुन्हा कमी झाल्यामुळे महिला ग्राहक खूष झाल्या आहेत.