
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मध्ये केरान व्हॅली नावाचं एक ठिकाण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असलेलं हे एक अत्यंत सुंदर आणि शांत असं गाव आहे. एलोसीपासून अगदी जवळ भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेलं हे गाव आहे.

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात हे सुंदर असं गाव असून हिल स्टेशन म्हणून ते चांगलेच प्रसिद्ध आहे. पर्यटक येथे जाऊन अद्भुत अशा लपलेल्या स्वर्गाला पाहू शकतात.

खास बाब म्हणजे या गावाच्या एका बाजूला भारत आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. या गावातून एक नदी वाहते. नदीच्या एका बाजूला भारत आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. काही वर्षांपूर्वी येथे दोन्ही देशांचे लोक एकमेकांशी बोलत होते. आता मात्र सुरक्षेच्या कारणामुळे यावर मर्यादा आल्या आहेत.

या गावात सुंदर डोंगर आहे. गावात हिवरवळ पाहायला मिळते. सुंदर वाहणारी नदी या भागात आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण फारच शांत आहे. तुम्हाला इथे पक्षांची किलबील ऐकायला येईल. त्यामुळेच हा भाग पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याचं म्हटलं जातं.

श्रीनगर विमानतळापासून हे गाव जवळपास 110 किमी दूर आहे. श्रीनगरवून कुपवाडापर्यंत लोकल टॅक्सीनेही जाता येते. त्यानंतर कुपवाडापासून डोंगरी रस्त्याने गाडीमधून जावे लागते.