
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये जान्हवी चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

निळ्या रंगाच्या फोटोमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत जान्हवीने कॅप्शनमध्ये 'wedding szn' म्हणजेच लग्न सराई... असं कॅप्शन दिलं आहे... चाहत्यांना देखील अभिनेत्राचा लूक आवडला आहे.

जान्हवी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. त्यामुळे तुम्ही देखील लग्नाची शॉपिंग करत असाल तर, जान्हवीचा हा लूक उत्तम पर्याय आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर जान्हवी कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवी सध्या शिखर पहाडिया याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.