‘धडक’ चित्रपटाच्या रिलीजनंतर डिप्रेशनमध्ये गेलेली जान्हवी, मनात येत होते वाईट विचार, म्हणालेली, लोक मला…

‘धडक’ चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर डिप्रेशनमध्ये गेली होती, नेमकं काय घडलं? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा.

| Updated on: Apr 06, 2026 | 12:42 PM
1 / 6
बॉलिवूडमधील तरुण आणि हुशार अभिनेत्री म्हणून ओळख असणारी जाह्नवी कपूर आज यशाच्या शिखरावर आहे. मात्र तिच्या करिअरची सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली होती. तिची आई, दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यांतच जाह्नवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ प्रदर्शित झाला होता.

2 / 6
2018 मध्ये धड़क या चित्रपटातून जाह्नवीने ईशान खट्टरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकत्याच राज शमनी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना जाह्नवीने तिच्या त्या काळातील भावनिक संघर्षाबद्दल खुलासा केला.

3 / 6
ती म्हणाली की, लोक आजही ‘धडक’बद्दल चांगलं बोलतात पण तिच्यासाठी त्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 'मला असं वाटत होतं की सगळं संपलं आहे, लोक माझा तिरस्कार करतात असं तिने सांगितलं.

4 / 6
तिच्या आयुष्यातील बहुतांश आत्मविश्वास आणि मान्यता तिला तिच्या आईकडून मिळायची. आईच्या निधनानंतर ती प्रेक्षकांकडून तीच अपेक्षा ठेवत होती. पण तसं घडलं नाही. 'मी फक्त नकारात्मक प्रतिक्रिया पाहत होते. चित्रपट हिट ठरला होता पण मला ते जाणवलंच नाही.

5 / 6
मला फक्त असं वाटत होतं की मी वाईट आहे आणि लोक मला नापसंत करतात असं ती म्हणाली. तिच्या मते, नकारात्मकतेकडे जास्त लक्ष दिल्यामुळेच तिची मानसिक स्थिती अधिक खालावली.

6 / 6
धड़क हा चित्रपट शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केला होता आणि करण जौहर यांच्या बॅनरखाली तयार झाला होता. हा 2016 मधील सुपरहिट मराठी चित्रपट सैराट चा रीमेक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 110 कोटींची कमाई केली होती.

Follow Us