जिओच्या 30 दिवसांच्या या रिचार्ज प्लानमध्ये 25 जीबी डेटासह अनेक फायदे,पाहा काय वैशिष्ट्ये
जिओ ही भारतातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी आहे.जिओचे अनेक रिचार्ज प्लान आहेत. आता जिओने एक ३० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लान बाजारात आणला आहे.या प्लानमध्ये २५ जीबीच्या डेटासह अनेक फायदे आहेत.

भारतातील सर्वात मोठी ऑपरेटर कंपनी असलेल्या जिओने एक नवीन, स्वस्तातला रिचार्ज प्लान आणला आहे. या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लानमध्ये नियमित प्लान प्रमाणचे फायदे आहेत. पण अधिकचा डेटा लाभ देखील मिळत आहे.

जिओच्या या प्लानची किंमत ३६५ रुपये आहे. हा प्रीपेड प्लान ३० दिवसांच्या वैधतेत उपलब्ध आहे. यात एकूण २५ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, युजर्स ६४ केबीपीएसच्या कमी वेगाने इंटरनेट वापरणे सुरू ठेवू शकतात. या प्लानमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस देखील फ्री मिळतात. याव्यतिरिक्त, यामध्ये ७.४७ रुपयांचा टॉकटाईम बॅलन्स समाविष्ट आहे.

या प्लानमध्ये JioHotstar चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन, JioAICloud वर ५० जीबी मोफत स्टोरेज आणि JioTV चे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. वापरकर्त्यांना ३५,१०० रुपयांच्या Google Gemini Pro प्लानचे १८ महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यामध्ये २००० जीबी क्लाऊड स्टोरेज आणि इतर विविध वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

मात्र, जेमिनीचे फायदे मिळवण्यासाठी, युजरना ३४९ रुपयांचा किंवा त्याहून अधिक किमतीच्या अनलिमिटेड ५ जी प्लानवर सक्रिय असणे आवश्यक आहे. या विशिष्ट पॅकमध्ये अनलिमिटेड ५ जी डेटा फायद्यांचा उल्लेख नाही.

याशिवाय आपल्या 'जिओ फ्रीडम प्लान' सिरीज अंतर्गत, जिओचा ३० दिवसांच्या वैधतेचा ३५५ रुपयांचा आणखी एक प्लान आहे. यामध्येही बहुतांशी तेच फायदे मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, २५ जीबी डेटा (त्यानंतर स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होतो) आणि दररोज १०० एसएमएस फ्री मिळतात. हे सर्व फायदे ३० दिवसांच्या वैधतेसह येतात.

जिओच्या विशेष ऑफरअंतर्गत, या प्लानमध्ये जिओ हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन, ५० जीबी स्टोरेजसह जिओ एआय क्लाऊड, गूगल जेमिनीचा १८ महिन्यांचा मोफत प्रो प्लॅन (ज्यात २००० जीबी क्लाउड स्टोरेज मिळते) आणि नॅनो बनाना यांचा समावेश आहे.