
गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा हिचा रविवारी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने विवाह स्वागत समारंभ पार पडला. नताशाचा पती एलन पटेल ख्रिश्चन धर्मीय असल्याने पारंपरिक ख्रिश्टन पद्धतीनेही हा समारंभ केला.

गोव्यातील एका रिसॉर्टवर थाटामाटात ख्रिश्चन पद्धतीने हा विवाह स्वागत समारंभ पार पडला. समुद्रकिनारी ओपन गार्डनमध्ये या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.

विवाह स्वागत समारंभासाठी नताशा आणि एलन यांनी पारंपरिक ख्रिश्चन वेशभूषा केली होती. पांढऱ्या रंगाच्या वेडिंग गाऊनमध्ये नताशा खूप सुंदर दिसत आहे.

नताशा आणि अॅलनचा विवाह गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. गोव्यातील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये काही नेते मंडळी आणि बड्या लोकांची यावेळी उपस्थिती राहिली.

या विवाह स्वागत समारंभासाठी शिवसेना नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला जयपूरला हजेरी लावल्यानंतर या सर्व नेत्यांनी गोवा गाठत, या सोहळ्याला उपस्थिती लावली.

शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर या विवाह स्वागत समारंभासाठी उपस्थित होते.