धो धो पाऊस पडल्यानंतर भारतातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या, तिसरं ठिकाण म्हणजे स्वर्ग

पावसात अनेकांना फिरायला फार आवडतं. मुसळधार पडणार पाऊस, प्रवास आणि थंड वातावरण... फिरल्यामुळे नवीन ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न होतं. अशात भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे इतका पाऊस पडतो की तिथली दृश्ये पाहण्यासारखी बनतात. तर भारतात अशी पाच ठिकाणं आहेत, जेथे तुम्ही पावसाळ्यात जाऊ शकता...

| Updated on: Jun 14, 2026 | 2:57 PM
1 / 5
 केरळमधील मुन्नार हे पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथील मनमोहक निसर्गदृश्ये पाहून आपण जणू दुसऱ्याच जगात आल्यासारखं वाटतं. येथे जून ते सप्टेंबर या काळात मुसळधार पाऊस पडतो, ज्याचा पर्यटक पुरेपूर आनंद घेऊ शकतात. हलक्या ते मध्यम पावसात ढगांनी वेढलेली दरी, चहाचे मळे आणि सुंदर धबधबे पाहण्यासारखे असतात.

2 / 5
कर्नाटकातील कुर्गमध्ये पावसाळ्यातही अतिशय सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. याला ‘भारताचे स्कॉटलंड’ असंही म्हटलं जातं. येथे जून ते ऑक्टोबर या काळात पावसाळ्याचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात कुर्ग हिरवळीच्या चादरीने वेढलेलं असतं. येथील कॉफीचे मळे, धबधबे आणि थंडगार वारा या ऋतूचा आनंद आणखी वाढवतात. पावसाळ्यातील येथील शांत वातावरण मनाला शांत करण्यासाठी अगदी योग्य आहे.

3 / 5
जुलै महिन्यात तुम्ही  व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या ठिकाणाला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला अनेक प्रकारची फुले पाहायला मिळतात. येथील दृश्य जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत सर्वात सुंदर मानलं जातं. ट्रेकिंग आणि निसर्ग फोटोग्राफींच्या शौकिनांसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.

4 / 5
पावसाळ्यात मेघालयाला  फिरायला जाणं हा एक वेगळाच अनुभव असतो. येथे मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात होते आणि दररोज मुसळधार पावसाचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. म्हणूनच मेघालयाची गणना भारतातील सर्वाधिक पावसाच्या राज्यांमध्ये केली जाते. पावसाळ्यात येथील हिरवीगार डोंगररांग, तलाव आणि धबधबे एक अद्भुत दृश्य सादर करतात. पावसाळ्यात हे ठिकाण पूर्णपणे ढगांनी वेढलेलं असतं.

5 / 5
जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि पावसाळ्याचा आनंद घेऊ इच्छित असाल, तर लोणावळ्यापेक्षा उत्तम ठिकाण नाही. जून ते सप्टेंबर या काळात येथे भरपूर पाऊस पडतो आणि हवामान खूपच रमणीय होते. पावसाला सुरुवात झाल्यावर येथील डोंगर, धबधबे आणि दऱ्या जणू जिवंत झाल्यासारखे वाटतात.

Follow Us