Kamal Hasaan: कमल हासन यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का, पैसे कमावतात कुठून?

आज म्हणजे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कमल हासन यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या एकूण संपत्तीविषयी...

Updated on: Nov 07, 2025 | 2:05 PM
1 / 10
भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते कमल हासन यांना आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांच्या दमदार अभिनयामुळे, प्रयोगशील भूमिकांमुळे आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे 'युनिव्हर्सल हिरो' म्हटले जाते.

2 / 10
आज म्हणजे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कमल हासन यांचा वाढदिवस आहे. तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या कमल हासन यांनी अवघ्या ६ वर्षांच्या वयात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

3 / 10
कमल हासन यांनी बालकलाकार म्हणून 'कलाथूर कन्नम्मा' (१९६०) या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर कमल हासन यांनी 'मूंद्रम पिरई', 'नायकन', 'हे राम', 'विश्वरूपम', 'दशावतारम', 'इंडियन' आणि 'विक्रम' यासारख्या चित्रपटांमधून आपल्या प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी केवळ अभिनयातच नव्हे तर दिग्दर्शन, निर्मिती आणि पटकथा लेखनातही आपली प्रतिभा दाखवली आहे.

4 / 10
कमल हासन यांचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्याचे नाव 'राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल' असे आहे. याअंतर्गत अनेक सुपरहिट चित्रपट तयार झाले आहेत.

5 / 10
CNBC-TV18 च्या अहवालानुसार कमल हासन यांची एकूण संपत्ती सुमारे ४५० कोटी रुपये आहे. ते मुख्यत्वे चित्रपटांतील अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट्स, निर्मिती संस्था आणि टीव्ही शो होस्टिंगमधून भरघोस कमाई करतात.

6 / 10
माध्यमांच्या अहवालांनुसार कमल हासन एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपयांपर्यंत फी घेतात. तर 'इंडियन २' चित्रपटासाठी त्यांनी सुमारे १५० कोटी रुपयांची फी घेतली होती.

7 / 10
कमल हासन यांच्याकडे चेन्नईमध्ये मोठी संपत्ती आहे. त्यामध्ये १३१ कोटी रुपयांच्या संपत्तीचा समावेश आहे. यात १७.७९ कोटी रुपयांच्या ३५.५९ एकर शेती जमीन आणि १९.५ कोटी रुपयांच्या दोन आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे.

8 / 10
कमल हासन यांची चेन्नईतील घर हे एखाद्या महालापेक्षा कमी नाही.  त्यांचा हा बंगला ६० वर्षे जुना आहे आणि तो त्यांच्या वडिलांचा असल्याचे म्हटले जाते.

9 / 10
याशिवाय कमल हासन यांच्याकडे मुंबईमध्ये अनेक मालमत्ता आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. तर लंडनमध्ये कमल हासन यांच्याकडे एक भव्य व्हिला आहे ज्याची किंमत २.५ कोटी रुपये आहे. ही त्यांची आंतरराष्ट्रीय संपत्ती आहे.

10 / 10
माहितीनुसार कमल हासन यांना लक्झरी गाड्यांचा शौक आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी गाड्या समाविष्ट आहेत ज्यात BMW 730LD आणि Lexus LX570 यासारख्या प्रीमियम लक्झरीयस कार्स आहेत. या गाड्यांची किंमत एक कोटी रुपयांपासून ते ३ कोटी रुपयांपर्यंत आहे.