
साप हा असा प्राणी आहे, ज्याच्याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. विशेष म्हणजे साप चावल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो, अशी भीती असल्याने या प्राण्याबाबत लोकांमध्ये एका प्रकारची भीतीही पाहायला मिळते. मात्र भारतात एक असे गाव आहे, जिथे प्रत्येक घरात साप आढळतो.

या गावात साप आणि तिथले लोक एकत्र राहतात. ते सापाला घापरत नाहीत. म्हणूनच या गावाला सापाचं गाव म्हटलं जातं. या गावात तर लोकांपेक्षा जास्त साप आहेत, असंही म्हटंल जातं.

या गावाचे नाव अगुम्बे असे असून ते कर्नाटक राज्यात आहे. या गावाला भारताची कोब्रा राजधानी असे म्हटले जाते. या गावात सापावर संशोधन केले जाते. विशेष म्हणजे या गावात साप हा तिथल्या संस्कृतीचाच एक भाग आहे.

इथे प्रत्येक घरात साप आढळणे ही सामान्य बाब असल्याचे म्हटले जाते. या गावातील लोक सापाला देवता मानतात. तसेच सापांची पूजा करतात.

सापांवर संशोधन करणारे रोमुलस व्हिटेकर यांनी येथे एआरआरएस नावाच्या संस्थेची स्थापना केलेली आहे. नागपंचमीच्या दिवशी या गावात सापांची पूजा केली जाते. तसेच हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोशल मीडियावर हे गाव म्हणजे सापांचे गाव आहे, असे म्हटले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)