‘बाळासाठी प्रार्थना..’; कतरिनाने सासूसोबत शिर्डी साईबाबांचं दर्शन घेताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानंतर अभिनेत्री कतरिना कैफ सोमवारी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला पोहोचली. यावेळी तिच्यासोबत तिची सासू आणि विकी कौशलची आई वीणा कौशलसुद्धा होत्या. कतरिना आणि तिच्या सासूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Dec 17, 2024 | 9:18 AM
1 / 6
अभिनेत्री कतरिना कैफ सोमवारी तिच्या सासूसोबत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचली. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात कतरिना आणि विकी कौशलची आई वीणा कौशल नतमस्तक झाल्याचं पहायला मिळालं.

2 / 6
यावेळी कतरिनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. शिर्डी साईबाबांसमोर कतरिनाने हात जोडले आणि मनोभावे प्रार्थना केली. यावेळचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 6
हे फोटो व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 'कतरिना कदाचित बाळासाठी प्रार्थना करत असेल', असं एकाने लिहिलं. तर 'आई होण्यासाठी कतरिना विशेष प्रार्थना करत असेल', असं दुसऱ्याने म्हटलंय.

4 / 6
शिर्डीत साई बाबांच्या दर्शनानंतर कतरिना आणि तिची सासू जेव्हा मुंबईत परतल्या, तेव्हा एअरपोर्टवरील एका व्हिडीओनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या व्हिडीओमध्ये कतरिना तिच्या सासूला मिठी मारताना आणि त्यांच्या कपाळावर किस करताना दिसली.

5 / 6
कतरिना आणि तिच्या सासूला याआधीही अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. ज्याप्रकारे ती तिच्या सासूची काळजी घेताना दिसते, ते पाहून नेटकरी तिचं खूप कौतुक करतात.

6 / 6
कतरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी विकी कौशलशी लग्न केलं. नुकताच या दोघांनी लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.