Katrina Kaif : वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद! कतरिना कैफचा ग्लॅमरस लूक चर्चेत

कतरिना कैफने इंडस्ट्रीशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीपासून खूप मेहनत केली. त्यांच्या सुंदरतेवर चाहते फिदा आहेत. पण वाढलेल्या वजनामुळे तिला नुकतंच खूप ट्रोल केलं गेलं, ज्याचं उत्तर तिने लेटेस्ट फोटोजद्वारे दिलं आहे.

| Updated on: Oct 10, 2026 | 3:17 PM
1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने 2021 मध्ये अभिनेता विक्की कौशलसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती आपलं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत ती चित्रपटांपासून पूर्णपणे दूर नसली, तरी तिने आपल्या कुटुंबालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. ( All Photos : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने 2021 मध्ये अभिनेता विक्की कौशलसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती आपलं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत ती चित्रपटांपासून पूर्णपणे दूर नसली, तरी तिने आपल्या कुटुंबालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. ( All Photos : Instagram)

2 / 7

7 नोव्हेंबर 2025 रोजी कतरिनाने मुलगा विहान कौशलला जन्म दिला. आई झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या लूक आणि पोस्टपार्टम वजनाचीही सोशल मीडियावर चर्चा झाली. अलीकडेच एका अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तिच्या वाढलेल्या वजनावरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. मात्र, आता अभिनेत्रीने आपल्या स्टायलिश अंदाजातून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

3 / 7

कतरिना आपल्या ब्युटी ब्रँड 'के ब्युटी'च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडनला गेली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक कलरच्या स्टायलिश आउटफिटमध्ये कतरिना अतिशय ग्लॅमरस दिसत असून तिच्या विविध पोझमधील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

4 / 7

फोटो शेअर करताना कतरिनाने लंडनमधील या खास क्षणांविषयी आनंद व्यक्त केला. तसेच, यूकेमध्ये 'के ब्युटी'च्या वर्धापनदिनाचं सेलिब्रेशन करत असल्याचंही तिने आपल्या कॅप्शनमधून सांगितलं.

5 / 7

कतरिनाने नायका (Nykaa) सोबत भागीदारी करून 'के ब्युटी' या ब्युटी ब्रँडची सुरुवात केली होती. या ब्रँडच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा साजरा करताना तिचा आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे.

6 / 7

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तिच्या लूकचं कौतुक करत 'कतरिना कैफचा क्लासी लूक' अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने तिच्या स्टाइलला 'आयकॉनिक' म्हटलं. आणखी एका चाहत्याने तिला जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री असं संबोधलं.

7 / 7

कतरिनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पोस्टपार्टम वजनावरून होणाऱ्या टीकेदरम्यान तिचा हा आत्मविश्वासपूर्ण अंदाज चाहत्यांना विशेष आवडत आहे. तिच्या या फोटोंमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते—कतरिना आपल्या स्टाइलने आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांची मनं जिंकत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us