
सखल प्रदेशातील जंगलात झाडांच्या मुळात आढळणारी ही कटरुआ नावाची भाजी शाकाहारी लोकांचे मटण म्हटली जाते. या भाजीला गरम मसाल्यात बनवल्याने तिची चव मटणासारखीच लागते.

कटरुआ नावाची ही जंगली भाजी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. ही भाजी कुठे आणि कधी येते, किंमत किती असते हे पाहूयात.. सीझनच्या सुरुवातीला तिची किंमत मटणाच्या तिप्पट असते.

ही भाजी युपीच्या पीलीभीत जिल्ह्यातील टायगर रिझर्व्हच्या दाट जंगलात आढळते. या जंगलातील साल वृक्षाच्या मुळात उगवते. जेव्हा सालची मुळे असलेल्या जमीनीवर पावसाचे पाणी पडते तेव्हा ही भाजी उगवते.ही वर्षातून तीन महिनेच मिळते.

कटरुआ नावाची ही भाजी केवळ चवीलाच नव्हे तर पोषक तत्वांनी पुरेपुर असते. प्रोटीनच्या बाबतीत नॉनव्हेजलाही टक्कर देते. सीझनच्या सुरुवातीला तर ती २००० रुपये किलो दराने मिळते. परंतू अनेक लोक तिला साठवून ठेवतात

तिला आधी स्वच्छ धुतात. नंतर मातीचा थर नीट काढल्यानंतर दोन किंवा चार वेळा तुकड्यात ती कापतात. त्यानंतर लसूण, कांदा गरम मसाल्यात चांगला भाजायचा. त्यात या भाजीला टाकायचे. काहीवेळ शिजवल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी रेडी होते.