Ketan Agarwal Siya goyal Lohgad Murder Case : आता कुणीच वाचवू शकणार नाही..सिया गोयलचं मैत्रिणीशी झालेलं प्रायव्हेट चॅट लीक, केतनच्या मर्डर…

Siya Goyal Snapchat Chat Screenshot : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपी सिया गोयल हिच्या कथित 'स्नॅपचॅट' (Snapchat) संभाषणाचा एक स्क्रीनशॉट समोर आला आहे. या चॅटमध्ये, सियाने मैत्रिणीकडे एक मागणी केली आहे. त्यांच्या चॅटमधून धक्कादायक सत्य समोर आलं आहे. केवळ इतरांना दिशाभूल करण्यासाठी आणि हत्येचा कट लपवण्यासाठीच लग्नाचे हे नाटक रचले गेले होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

| Updated on: Jul 04, 2026 | 2:07 PM
1 / 6
Siya Goyal Personal Chat Leak :  केतन अग्रवाल हत्येच्या अत्यंत हाय-प्रोफाईल प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस आणि तपास यंत्रणांच्या हाती आणखी एक कथित डिजिटल पुरावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिची एक मैत्रीण यांच्यातील अत्यंत संशयास्पद 'स्नॅपचॅट' (Snapchat) चॅट (संवाद)  पोलिसांच्या हाती लागलं आहे. केतनच्या हत्येमागे खोलवर रचलेलं आणि पूर्वनियोजित कारस्थान असल्याचे संकेत  या चॅटवरून  मिळतात. या कथित स्नॅपचॅट चॅटचा एक स्क्रीनशॉटही समोर आला आहे.  लग्नासाठी तिकिटं बुक करणे आणि ओळखपत्रांची (ID cards) मागणी करणं  अशा गोष्टींचा या स्क्रीनशॉटमध्ये समावेश असल्याचं दिसून आलं.

2 / 6

समोर आलेल्या एका स्नॅपचॅटच्या (Snapchat) स्क्रीनशॉटनुसार, 24 ते 26 मे या कालावधीत सिया गोयल आणि तिच्या मैत्रिणीमध्ये बोलणं झालं. त्यात सियाने आपल्या मैत्रिणीला मेसेज पाठवला होता की, "आधार कार्डचे पुढचे आणि मागचे फोटो पाठव... लग्नाच्या तिकिटांसाठी, ते तसेही कधीच होणार नाहीये— तरीही ते फोटो पाठवून ठेव." "ठीक आहे, मी ते व्हॉट्सॲपवर पाठवले आहेत" असा रिप्लाय तिच्या मैत्रिणीने त्यावर केला.

3 / 6

तपास यंत्रणांनी आता स्नॅपचॅटवरील (Snapchat) या संभाषणाशी संबंधित या विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित केलं आहे. "ते लग्न कधीच होणार नाही" संभाषणातील सियाच्या या विधानाने, पोलिसांसमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. लग्नाच्या तयारीचे आणि विमान प्रवासाच्या तिकिटांच्या बुकिंगचं हे सगळं नाटक, फक्त केतन अग्रवाल आणि तिच्या आसपासच्या लोकांना संशय येऊ नये म्हणूनच रचलं होतं का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

4 / 6

केतन अग्रवाल याच्या हत्येपूर्वी, तपास भरकटवण्यासाठी आणि आपण निर्दोष आहोत, असं भासवण्यासाठी सिया गोयल व सह-आरोपी चेतन चौधरी यांनी एखादी पूर्व-नियोजित रणनीती आखली होती का, याचाही पोलीस कसून तपास करत आहेत.

5 / 6

सध्या तरी त्या कथित स्नॅपचॅट (Snapchat) चॅटच्या सत्यतेबाबत किंवा खुनाच्या घटनेशी असलेल्या त्याचा थेट संबंध आहे, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही अशी माहिती तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी

6 / 6

पोलीसांकडून या चॅटशी संबंधित डिजिटल फूटप्रिंट्सची तपासणी केली जात आहे. फॉरेन्सिक तसेच सायबर पथकांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या दाव्यांमागील संपूर्ण सत्य समोर येईल असं सांगण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us