Kim Jong Un : आता आईसक्रीम शब्दावर बंदी, वापर केल्यावर थेट…किम जोंग उनच्या आदेशाने लोकांना फुटला घाम!

किम जोंग उन या हुकूमशाहाची जगभरात चर्चा असते. त्याने सध्या एक अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याला आईसक्रीम या शब्दावर आक्षेप आहे.

| Updated on: Sep 17, 2025 | 12:51 AM
1 / 6
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन कधी काय करेल हे सांगता येत नाही. त्याने आतापर्यंत असे काही फर्मान सोडलेले आहेत, ज्याच्यामुळे संपूर्ण जगच अवाक झालेले आहे. विशेष म्हणजे त्याचे शस्त्रांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याच्या एका निर्णयामळे जग युद्धाच्या खाईत लोटले जाते की काय? अशी चिंता व्यक्त केली जाते.

2 / 6
दरम्यान, आता हाच किम जोंग उन एका नव्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपल्या देशात अजब फर्मान सोडला आहे. आईस्क्रीम, हॅमबर्गर, कराओके या शब्दांमुळे तो चांगलाच संतापला आहे. संतापून त्याने एक नवा आदेश दिलाय.

3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार किम जोंग उन याने त्याच्या देशात हॅमबर्गर, कराओके, आईसक्रीम अशा शब्दांवर बंदी घातली आहे. हे शब्द पाश्चिमात्त्य असून त्यामुळे देशाच्या संस्कृतीवर परिणाम पडत आहे, असे किम जोंग उन याला वाटते. त्यामुळेच त्याने या शब्दांवर बंदी घातल्याचे म्हटले जात आहे.

4 / 6
उत्तर कोरियात अनेक बीच आणि रिसॉर्ट आहेत. अशाच एका वोनसन नवाच्या बीच-रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या टुरिस्ट गाईड्सना एक आदेश दिला आहे. परदेशी किंवा दक्षिण कोरियाई शब्दांचा वापर करू नये, असे या गाईडना सांगण्यात आले आहे.

5 / 6
आता किम जोंग उन याच्या फर्मानानंतर हॅमबर्गरला दाजिन-गोगी ग्योप्पांग म्हणजेच डबल ब्रेड विथ ग्राऊंड बिफ म्हणावे लागणार आहे. तसेच आईसक्रीमला त्या देशात इथून पुढे एसेकिमो असे म्हटले जाणार आहे. विशेष म्हणजे कराओके मशीनला ऑन-स्क्रीन अकंपनिमेंट मशीन असे नाव देण्यात आले आहे.

6 / 6
नॉर्थ कोरियातील मूळ शब्दांचा पुरस्कार करण्यासाठी तसेच सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. किम जोंग उन याने हा काही पहिलाच अजब निर्णय घेतलेला नाही. याआधीही जगाचे लक्ष वेधणारे धक्कादायक निर्णय त्याने घेतलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरियात परदेशी टीव्ही शो पाहण्यास मनाई आहे. एखादी व्यक्ती हा गुन्हा करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते, असे सांगण्यात येते.