
मलायका अरोरा ही 50 वर्षांची असून तिच्या ग्लॅमरस लूकसाठी कायमच चर्चेत असते. मलायका नेहमीच अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसते. मलायकाची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

भर कार्यक्रमात मलायका अरोरा हिच्यावर संताप व्यक्त करताना किरण खेर या दिसत आहेत. हेच नाही तर तिला खडेबोल हे देखील सुनावण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या शोमध्ये किरण खेर आणि मलायका अरोरा या पोहचल्या होत्या. यावेळी एसी जास्त असल्याचे म्हणताना मलायका दिसली. थंडी वाजत असल्याचे मलायका म्हणते.

यावेळी करण खेर या थेट म्हणतात की, मांड्या झाक तुझ्या मग थंडी वाजणार नाही. दोन दोन मिनिटाला तू मांड्या दाखवत आहेस, मग काय होणार.

करण खेर यांचे हे बोलणे ऐकून करण जोहर हा देखील हैराण होतो. यावर मलायका अरोरा म्हणाली, मी तर दाखवणारच..आता याचे काही फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.