
स्वयंपाक घर, प्रत्येक घरात या जागेचं एक खास महत्व असतं. जिथे आपल्यासाठी, कुटुंबियांसाठी रोज जेवण तयार केलं जातं, तसेच कच्चे व शिजलेले अन्नपदार्थही तिथे ठेवले जातात. पण आज आपण अशा एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे प्रत्येक घारत स्वयंपाक घर तर आहे, पण तिथे महिला किंवा पुरूष कोणीच स्वयंपाक करत नाहीत. मग गॅस न पेटवतात, जेवण न बनवता इथल्या लोकांचं भरण-पोषण कसं होतं, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल ना ? तर मग ऐका, या गावातील लोकं एकदी दिवस उपाशी झोपत नाही आणि अगदी आनंदाने आयुष्य जगत आहेत. ( photo : Social Media / Freepik)

हे गाव कुठे परदेशात नव्हे तर आपल्याच भारतात, गुजरातमध्ये आहे. चांदणकी असं या गावाचं नाव असून तिथे प्रत्येक घरात गॅस, चूल पेटवून स्वयंपाक केला जात नाही.

तर तिथे सर्व लोकांचं खाण, जेवण एकाच ठिकाणी बनतं. आणि सगळेच एकाच ठिकाणी, एकत्र बसून जेवतात. पालकांना दररोज अन्न शिजवण्याचा त्रास होऊ नये म्हणून बाहेर राहणाऱ्या तरुणांनी गावात राहणाऱ्या वृद्धांसाठी ही व्यवस्था केली आहे. येथे राहणाऱ्या वृद्धांची संख्या जास्त आहे.

खरंतर या गावाची लोकसंख्या सुमारे 1 हजाराच्या आसपास आहे. या गावातील काही तरुण परदेशात स्थायिक झाले आहेत, तर काही जवळच्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत.

त्यामुळे या गावात वृद्धांची संख्या बरीच आहे आणि वृद्धांना वेगळे अन्न शिजवावे लागू नये म्हणून गावकऱ्यांनी एकत्र अन्न शिजवण्याची आणि एकत्र जेवण्याची प्रथा सुरू केली, जी आजही चालू आहे.

या गावातील सर्व लोक केवळ एकत्र जेवतातच असं नाही तर ते त्यांच्या सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात आणि परस्पर समन्वयाने ते सर्वात मोठ्या समस्यांवरही उपाय शोधतात. आज हे गाव संपूर्ण देशात एकात्मतेचे उदाहरण आहे. या गावाची संस्कृती पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात. या गावात सर्व सण एकत्र साजरे केले जातात.

गावात एकत्र स्वयंपाक करण्याची ही पद्धत फक्त खाण्यापिण्यापुरती मर्यादित नाही. तर त्यामागचा उद्देश म्हणजे वृद्धांवरील, विशेषतः आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या महिलांवरील ओझे कमी करणे आहे. गावाच्या कानाकोपऱ्यात पसरत असलेल्या एकाकीपणाशी लढणे हाही त्याचा उद्देश आहे.

या गावात एक सामुदायिक स्वयंपाकघर बांधण्यात आले आहे, जिथे संपूर्ण गावासाठी दररोज जेवण तयार केले जाते. जेवणात चविष्ट आमटी, भाज्या आणि पोळ्या तयार केल्या जातात. या स्वयंपाकघरात दररोज 60 ते 100 लोकं जेवण बनवतात आणि ते सर्व गावकऱ्यांना एकत्र दिले जाते. एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्यानंतर या गावात पंचायती राज सुरू झाल्यापासून येथे ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या नाहीत.