
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज मिस वर्ल्ड स्पर्धेचा फिनाले पार पडतोय. या फिनालेकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत.

यापैकी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये सिनी शेट्टी ही तूफान चर्चेत आहे. सिनी शेट्टी ही मुंबईची आहे. सिनी शेट्टीचा जन्म 2 आॅगस्ट 2001 मध्ये मुंबईमध्ये झालाय.

सिनी शेट्टीचे शिक्षण हे घाटकोपरमध्ये झाले असून तिने डॉमिनिक सॅव्हियो स्कूल शिक्षण घेतले. मुंबईच्या एसके सोमय्या कॉलेजमधून तिने पदवी घेतलीये.

सिनी शेट्टीचे सोशल मीडियावर 400 हजार फॉलोअर्स आहेत. भारतीय लोक हे सिनी शेट्टी हिला सपोर्ट करताना दिसत आहेत.

हेच नाही तर सिनी शेट्टी हिला मिस वर्ल्ड 2024 च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. आता या फिनालेकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत.