
दारू ही आरोग्यासाठी घातक आहे. मग ती शॅम्पेन असो की वाइन.. पण दोन्ही बाबत बराच गोंधळ आहे. अनेकांना वाटतं की दोन्ही प्रकार एक सारखेच आहेत. पण यात फरक आहे. वाइन तज्ज्ञांच्या मते, शॅम्पेन ही एक प्रकारची वाइन आहे. पण प्रत्येक शॅम्पेन वाइन नसते. दोघांमध्ये फरक आहे. चला जाणून घेऊयात. (Pic: Unsplash)

स्पार्कलिंग वाइन आणि शॅम्पेनमध्ये मोठा फरक हा ती कुठे तयार केली आहे यावरून ठरतो. फ्रान्समधील शॅम्पेन शहरात तयार केली असेल शॅम्पेन म्हंटलं जाते. तुम्ही जर शॅम्पेन खरेदी केली तर त्याच्या लेबलवर फ्रान्स शहरात तयार केल्याचं नमूद केलेलं असतं. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी तयार केलेल्या वाइनला शॅम्पेन म्हणता येणार नाही. त्यासाठी स्पार्कलिंग वाइन हा शब्द योग्य ठरेल. पण सहजा वाइन हा शब्द प्रचलित आहे. (Pic: Unsplash)

वाईन आणि शॅम्पेन तयार करण्यासाठी द्राक्षांचा वापर केला जातो. पण असं असलं तरी फरक आहे. फ्रान्समधील शॅम्पेनमध्ये उगवलेल्या द्राक्षांचा वापर शॅम्पेनसाठी केला जातो. चार्डोने आणि पिनोट नॉयर या प्रजातीची द्राक्ष वापरली जातात. (Pic: Unsplash)

वाईन तयार करण्यासाठी जगभरातील कोणत्याही प्रजातींचा वापर केला जातो. ही द्राक्ष जगातील वेगवेगळ्या भागातून मागवली जातात. पण त्यात शॅम्पेन शहरातील द्राक्ष नसतात. वाईन आणि शॅम्पेन तयार करण्याची पद्धतही वेगळी आहे. (Pic: Unsplash)

शॅम्पेन तयार करण्यासाठी द्राक्ष एका मोठ्या टाकीत ठेवली जातात आणि फर्मेटेशन प्रक्रियेतून जावं लागतं. यानंतर ही प्रक्रिया बाटलीत वारंवार केली जाते. 15 महिन्यांसाठी ती तशीच ठेवली जाते. त्यानंतर त्यात काही गोष्टी मिसळल्या जातात. पुन्हा काही महिने स्टोर केल्यानंतर विक्री केली जाते. वाइन तीन वेळा स्टोर केली जाते आणि थंड केली जाते. त्यानंतर यीस्ट आणि साखर मिसळली जाते. (Pic: Unsplash)

शॅम्पेनच्या तुलनेच वाइनची टेस्ट गोड आणि फळासारखी लागते. तर ड्राय वाइन घेणारे लोकं शॅम्पेनला अधिक पसंती देतात. पण कोणत्याही स्वरुपाती अल्कोहोल शरीरासाठी घातक आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (Pic: Unsplash)