
यंदाच्या वर्षाचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी दिसणार आहे. हे सूर्यग्रहण अत्यंत महत्वाचे असणार आहे. भारतीय वेळेनुसार, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी होईल आणि ते 4 तास 24 मिनिटे चालेल.

हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10.59 ला सुरू होईल आणि 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3.23 पर्यंत चालेल. या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका या भागात हे सूर्यग्रहण दिसेल. भारताच्य कोणत्याही भागात हे सूर्यग्रहण दिसणार नाहीये. कारण भारतात त्यावेळी रात्र असणार आहे.

फक्त भारतच नाही तर नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका येथे कुठेही दिसणार नाहीये. काही दिवसांपूर्वीच भारतात चंद्रग्रहण दिसले.

हे सूर्यग्रहण आपल्याला बघता आले नसले तरीही या सूर्यग्रहणाचे काही फोटो आणि व्हिडीओ पुढे येतील आणि हे आपण आरामात बघू शकता.