Knowledge : लाल आणि हिरवा, रात्री विमानात लागणाऱ्या या दिव्यांचं कारण काय ?

Airplane Lights : विमानांमध्ये लाल, हिरवे आणि पिवळे दिवे का असतात हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया याचे कारण काय आहे आणि हे दिवे का आवश्यक आहेत हेही समजून घेऊया.

| Updated on: Nov 19, 2025 | 1:16 PM
1 / 6
जेव्हा जेव्हा तुम्ही अंधारलेल्या रात्री आकाशाकडे पाहता तेव्हा आकाशात विमान दिसतं, आणि त्यासोबतच विमानाच्या बाहेर थोडे लहान पण लुकलुकणारे दिवे दिसतात. कधी लाल, हिरव्या तर कधी पिवळ्या रंगाचे विमानावरचे हे दिवे आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण हे दिव फक्त सजावटीसाठी नाहीत, तर त्यांची खूप महत्त्वाची भूमिका असते.

2 / 6
 या दिव्यांना नेव्हिगेशन किंवा पोझिशन लाइट्स असे म्हटले जाते. हे दिवे वैमानिक, हवाई वाहतूक नियंत्रक आणि इतर विमानांनाही, त्यांच्या विमानाची दिशा आणि वेग निश्चित करण्यास मदत करतात. या बद्दल सविस्तर जाणून आपलं नॉलेज वाढवू, चला..

3 / 6
का महत्त्वाचे असतात दिवे : जगातील प्रत्येक विमान कठोर आणि प्रमाणित लायटिंग सिस्टीमचे पालन करते. FAA आणि ICAO सारख्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी हे दिवे अनिवार्य केले आहेत. जेणेकरून वैमानिक अंधारात अंतर, दिशा आणि वेगाचा अंदाज घेऊ शकतील. या दिव्यांशिवाय विमानांना आकाशात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

4 / 6
विमानाच्या पंखांवर लाल आणि हिरवे दिवे का लावले जातात? : लाल दिवा नेहमी डाव्या पंखाच्या शेवटी असतो, तर हिरवा दिवा उजव्या पंखाच्या शेवटी असतो. हे म्हणजे विमानाचे ट्रॅफिक सिग्नल आहेत. पण या सिग्नलमध्ये थांबा आणि पुढे जा अशा सूचना नसतात तर ते दिशा दर्शवतात. हे दिवे धावपट्टीवर, नियंत्रण टॉवरमध्ये किंवा दुसऱ्या कॉकपिटमध्ये असलेल्या कोणालाही, येणारे आणि जाणारे विमान एका नजरेत ओळखू शकतं.

5 / 6
दिशा शोधण्यात दिवे कसे मदत करतात ?: हे नेव्हिगेशन दिवे आकाशात कंपाससारखे काम करतात. लाल आणि हिरवे दोन्ही दिवे एकत्र पाहण्याचा अर्थ असा की विमान थेट त्यांच्या दिशेने उडत आहे. जर फक्त लाल दिवा दिसत असेल तर विमान उजवीकडून डावीकडे जात आहे. जर फक्त हिरवा दिवा दिसत असेल तर विमान डावीकडून उजव्या दिशेने येत आहे.

6 / 6
विमानांमध्ये सहसा पांढऱ्या रंगाचे स्ट्रोब दिवे वापरले जातात. हे दिवे वेळोवेळी चमकतात, ज्यामुळे ते गडद आकाशात सहज दिसतात. विमान अमेरिकन असो, भारतीय असो किंवा ऑस्ट्रेलियन असो, सर्व विमानांसाठी लायटिंगचे नियम सारखेच असतात. या दिव्यांमुळे टक्कर टळते, नेव्हिगेशनमध्ये मदत करतात आणि ग्राउंड स्टाफला सतर्क करतात.