
कोकण... महाराष्ट्राला लाभलेली अलौकिक निसर्ग देण... हा निसर्ग डोळे दिपवून टाकतो. असाच निसर्गाचा अप्रतिम नजारा राज्याच्या पर्यटन विभागाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर कोकणचा निसर्ग किती लोभस आहे, याचं दर्शन घडतं... कितीही प्रयत्न केला तरी या फोटोवरून आपली नजर हटत नाही. पाहावं तिथपर्यंत दिसणारा निळाशार समुद्र...

डोळे जातील तिथवर समुद्राचं पाणीच पाणी अन् सागरकिनारी हिरवीगार झाडी.... किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या होड्या... केवळ अप्रतिमच...

वर्षातील प्रत्येक अतिरिक्त दिवस कसा अविस्मरणीय बनवणार? आम्ही सुचवतो. कोकणातील मालवणपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या आचरा या निसर्गाची कृपादृष्टी असलेल्या गावी सहलीची योजना करा आणि रम्य आठवणी बनवा!, असं म्हणत महाराष्ट्र टुरिझमच्या पेजवरून हे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.

येवा कोकण आपलोच असा... ही ओळ जरी आपलीशी करणारी असली तरी याचमुळे कोकणात जाण्याचा मोह आवरत नाही. एकदातरी जावं असं ठिकाण म्हणजे आपलं कोकण... भूरळ पाडणारी निसर्गरम्य दृश्य...