
जगातील सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीमध्य मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. अंबानी कुटुंबीयांचा शाही थाट हा कायमच चर्चेत राहिला आहे. मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी या 91 वर्षांच्या आहेत. त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकदा लोकांना पडतो. चला जाणून घेऊया...

कोकिलाबेन अंबानी या 91 वर्षांच्या आहेत. त्या मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष) आणि अनिल अंबानी (रिलायन्स एडीए ग्रुपचे अध्यक्ष) यांच्या आई आहेत. भारतातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत अंबानी कुटुंबाच्या प्रमुख आहेत असे म्हणायला हरकत नाही. 2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल यांच्यातील मतभेद वाढले होते. कोकिलाबेन यांनी यावर तोडगा काढला. त्यांनी रिलायन्सच्या संपत्तीचे विभाजन केले, ज्यामुळे वाद मिटला आणि कुटुंबात शांतता प्रस्थापित झाली.

कोकिलाबेन अंबानी या दिवंगत उद्योजक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याकडे एकूण संपत्ती अंदाजे ₹18,000 कोटी इतकी आहे. एका वृत्तामध्ये असे नमूद केलेले आहे की कोकिलाबेन यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सुमारे 1.57 कोटी शेअर्स आहेत.

कंपनीच्या एकूण हिस्सेदारीच्या सुमारे 0.24% शेअर्स हे कोकिलाबेन अंबानी यांच्याकडे आहेत. अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत त्यांच्याकडे जास्त शेअर्स असल्याचे म्हटले जाते. मुकेश अंबानी यांच्याकडे कंपनीच्या सुमारे 0.12% हिस्सेदारी आहे.

कोकिलाबेन अंबानी आणि धीरूभाई अंबानी यांना चार मुले आहेत: मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दिप्ती साळगांवकर. कोकिलाबेन यांचा जन्म 1934 मध्ये गुजरातमधील जामनगर येथे झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंतचा प्रवास पाहिला आहे. जामनगर हे अंबानी कुटुंबासाठी विशेष आहे, कारण येथे रिलायन्स इंडस्ट्रीजची रिफायनरी स्थापन करण्यात आली आहे.