अखेर माधुरी हत्ती नांदणी मठात, कोल्हापुरात दिवाळीसारखा उत्साह, फोटोंवरून नजरा हटणार नाही

अखेर नांदणी मठात माधुरी हत्तीची एन्ट्री झाली आहे. गुजरातच्या वनतारामधून 13 महिन्यांनी कोल्हापुरात पोहोचली आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 8:29 AM
1 / 5
कोल्हापूरच्या शिरोळमध्ये असलेल्या नांदणी मठात माधुरी हत्ती अखेर 13 महिन्यांनी एन्ट्री झाली आहे. माधुरी हत्ती ही मागील काही महिन्यांपासून गुजरातच्या वनतारामध्ये होती.

कोल्हापूरच्या शिरोळमध्ये असलेल्या नांदणी मठात माधुरी हत्ती अखेर 13 महिन्यांनी एन्ट्री झाली आहे. माधुरी हत्ती ही मागील काही महिन्यांपासून गुजरातच्या वनतारामध्ये होती.

2 / 5

न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानंतर माधुरी हत्ती कोल्हापुरात परतली. वनताराचे सीईओ विवान कर्णिक आणि टीमने माधुरी हत्तीला घेऊन नांदणी मठात पोहोचले. यावेळी माधुरीवर मोठ्या प्रमाणात पृष्पवृष्टी करण्यात आली.

3 / 5

माधुरी हत्तीच्या स्वागतासाठी रांगोळी देखील काढण्यात आली होती. यावेळी कोल्हापूरकरांनी अनंत अंबानी यांच बॅनर लावून आभार मानले.

4 / 5

माधुरी कोल्हापुरात परतल्यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला. नांदणी मठाजवळ एकच गर्दी केली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारासही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

5 / 5

माधुरी हत्ती नांदणी मठातून वनतारामध्ये जाताना कोल्हापूरकरांनी जोरदार विरोध केला होता. तिला वनतारा येथे नेताना माधुरी हत्तीने फळ देखील खाल्ली नव्हती. त्यावेळी कोल्हापूरकरांनी भावुक होत निरोप दिला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us