
अभिनेत्री क्रिती सनॉन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटादरम्यान क्रितीचं नाव 'बाहुबली' स्टार प्रभासशी जोडलं गेलं होतं. मात्र दोघांनीही डेटिंगच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं.

आता क्रितीचं नाव एका मिस्ट्री मॅनशी जोडलं जातंय. 'रेडिट'वर एक पोस्ट व्हायरल होत असून त्यात क्रिती सनॉन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला जातोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये पाठमोरी उभी असलेली क्रिती एका मुलासोबत दिसून येत आहे. क्रितीचं नाव या मिस्ट्री मॅनसोबत जोडलं जातंय.

हा मिस्ट्री मॅन युकेमधील कोट्यधीश बिझनेसमन असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं नाव कबीर बहिया असून क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीशी खास कनेक्शन असल्याचं कळतंय.

कबीर बहिया आणि महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी हे नातेवाईक असल्याचंही समजतंय. कबीर ब्रिटेनमध्ये राहत असून इन्स्टाग्रामवर साक्षीसोबतचे त्याचे फोटोसुद्धा पहायला मिळतात.