
यूट्यूबर म्हणून ओळख मिळवणारे आणि आता म्यूझिक व्हिडीओ करणारे पायल मलिक, अरमान मलिक आणि कृतिका मलिक हे कायमच चर्चेत असतात.

अरमान मलिकची पहिली पत्नी पायल असून कृतिका मलिक तिची मैत्रिण होती. कृतिकाने चक्क बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबतच लग्न केले.

हे तिन्ही आता फेमस असलेले चेहरे आहेत. नुकताच मुलाखतीमध्ये कृतिका मलिकने मोठे खुलासे केले आहेत. लोक कशाप्रकारे आपल्यावर कमेंट करतात, याबद्दल बोलताना कृतिका दिसली.

कृतिका म्हणाली की, अरमान मलिकसोबत लग्न करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मैत्रिणीचे घर तोडल्याचा आरोप माझ्यावर केला जातो. आताही लोक तशाच कमेंट करतात.

आज पायल मलिक, अरमान मलिक आणि कृतिका मलिक हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. पायल मलिक आणि कृतिका मलिक या अरमान मलिकच्या पत्नी आहेत.