Photo : ‘झिम्मा’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार क्षिती जोग, साकारणार दुहेरी भूमिका

| Updated on: Mar 18, 2021 | 5:15 PM

मराठी, हिंदी मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानंतर क्षिती जोग घराघरात पोहोचली आहे. आपल्या अप्रतिम अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली.(Kshiti Jog playing a new role in the marathi movie 'Jhimma')

1 / 5
मराठी, हिंदी मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानंतर क्षिती जोग घराघरात पोहोचली आहे. आपल्या अप्रतिम अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली.

2 / 5
आजवर अभिनेत्री म्हणून नावाजलेली क्षिती आता मराठी सिनेसृष्टीत एक नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षिती आता 'चलचित्र कंपनी' च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे.

3 / 5
'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'झिम्मा' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा क्षिती सांभाळत असून हा चित्रपट 23 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

4 / 5
निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासह सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला 'झिम्मा' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी सर्वांना उत्सुकता होती. टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

5 / 5
प्रेक्षकांनीच नाही तर अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे ‘झिम्मा’च्या निमित्ताने हेमंत आणि क्षितीची ही ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिग्दर्शक -अभिनेत्री म्हणून एकत्र काम करणार आहे.