लाडक्या बहिणींना खरंच ई-केवायसीची आणखी एक संधी? सरकारनं केलं स्पष्ट; नेमकं सत्य काय?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याची आणखी एक संधी चालून आली आहे, असा दावा केला जात होता. याबाबत आता सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

| Updated on: May 21, 2026 | 9:57 AM
1 / 5
लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. काही लाडक्या बहिणींना या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये मिळत आहेत.

2 / 5
तर काही लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. या लाडक्या बहिणींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने हे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. परंतु या लाडक्या बहिणींची संधी अजूनही गेलेली नाही असा दावा केला जात होता.

3 / 5
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींना अनेकवेळा मुदत वाढवून देण्यात आली होती. अगदी 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येत होती. परंतु आता याच लाडक्या बहिणींना आणखी एक संधी चालून आली आहे, असे म्हटले जात होते. परंतु याबाबत महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

4 / 5
ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पैसे आलेले नाहीत. अशा लाडक्या बहिणींना  जिल्हा महिला विकास विभागाच्या माध्यमातून ई-केवायसी करता येईल, असे सांगितले जात होते. परंतु यात कोणतेही तथ्य नाही. सरकारने तसा कोणताही आदेश दिलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

5 / 5
जिल्हा महिला विकास विभागात  ई-केवायसीची प्रक्रिया चालू नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us