Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!

Ladki Bahin Yojana 2026: राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा निधी अद्याप आलेला नाही. त्यामुळे या महिन्यात 3000 रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 2:51 PM
1 / 5
महाराष्ट्र सरकारसाठी गेमचेंजिंग ठरलेली आणि अति महत्त्वकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ओळखली जाते. या योजनेअंतर्गत, पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत मिळते. पण या महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे महिलांना 3000 रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

2 / 5
2024मध्ये लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिन्यातदेखील जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता मिळून महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

3 / 5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत.

4 / 5
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय  जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.

5 / 5
यापूर्वी लाडकी बहिण योजनेसाठी वळवलेला निधींमध्ये फेब्रुवारी २०२६ जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, जून २०२५ एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये निधी वळवल्याचे समोर आले आहे.

Follow Us