Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेबाबात मोठी अपडेट! जूनचा हप्ता या दिवशी येणार
Ladki Bahin Yojana June installment: महाराष्ट्रातील लोकप्रिय योजना लाडकी बहिणचा जून 2026चा हप्ता अद्याप आलेला नाही. तो कधी येणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात गेमचेंजिंग ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेचा जून महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला नाही. मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये आला होता, मात्र जून महिना आज संपत आला तरीही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यभरात अनेक लाडक्या बहिणी हप्ता कधी जमा होणार याची विचारणा करत आहेत. आता या बाबात मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे १२ ते १५ जुलै दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या अर्जांची कसून पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया राबवली आहे. या प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरलेल्या किंवा योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या अनेक अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर हप्ता वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा आहे.

यापूर्वीही काही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे यावेळी काही दिवस उशीर झाल्यासही काळजी करण्याचे कारण नाही, असे प्रशासनातील सूत्रांचे मत आहे.

निधी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) माध्यमातून पाठवण्यात येणार आहे.